Patients
माझे मनोगत,
मी कु. दर्शना दत्तगुरु बेर्डेजयसिंगपूर मी मागील आठ वर्षापासून (Osteoporosis) आजाराने त्रस्त आहे. माझे आई बाबा मागील आठ वर्षे माझ्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. पण माझ्या बाबांना अजूनपर्यंत त्यात काही यश आले नाही. तसे आमचे कुटुंबच आजाराने त्रस्त आहे. माझा भाऊ यश त्याला पण स्मरणशक्ती कमी आहे. त्याचेपण आपल्या येथे उपचार चालू आहेत. आम्ही चौघेपण आपले पेशंट आहोत.
पण, सर तुमच्याबद्दल लिहायचे म्हटले तर, माझे बाबा, श्री. स्वप्नील शहा, जयसिंगपूर यांच्या सांगण्यानुसार आम्ही येथे आलो. पण, सर मी आणि बाबा येथे आल्यावरतुमच्या सेंटरमधील सर्व पेशंटची माहिती घेता तर तुमच्याबद्दल खूप नवलच वाटले. पेशंटचीPositive thinking तुमच्या बद्दल खूप आहे. तुम्ही तुमच्या पेशंटसाठी देवचं आहात. येथे सर्व पेशंट जे काही आले आहेत ते बाहेरून Allopathyमध्ये थकून आले आहेत. पण सर्वजण आपल्या हॉस्पिटल मधून बरे होऊन, आनंदाश्रू काढून, आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. तुमचाStaff,Assistant Doctors, , Managementखूप कौतुकास्पद आहेत.
आम्ही पण तुमच्याकडे कन्स्लटिंगसाठी साठी तुमच्या केबिन मध्ये आलो, तेव्हा पण आम्हाला तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर काही वेगळेच वाटले. तुमची पेशंटची, त्यांच्याकडे बघण्याची नजर व त्याचा अभ्यास तेव्हाच वाटले खरंच तुमच्यात एक अनोखी जादू आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावर दैवत दिसतो म्हणतात ना तेच दैवत आम्हाला तुमच्यात दिसते आणि आम्हाला Confidence आला आहे की मी इथे नक्कीच बरी होऊ शकते आणि मला वाटते, माझ्या बाबांचा इतक्या वर्षाचा चालू असलेला डॉक्टरांचा शोध इथेच संपला. तुमच्याबद्दल लिहावे तेवढे कमीच. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो , तुमच्याकडून जीवनदान मिळो अशाच हजारो पेशंटना , आम्ही तुमचे , तुमच्या Assistant Doctors, Staff, Managementसर्वांचे शतशः आभारी आहोत.
आपलीच,
कु. दर्शना दत्तगुरु बेर्डे